रोजचे ट्रेंडिंग, हॅशटॅग, वादविवाद यामुळे ट्विटर नेहमीच चर्चेत असतच. पण जेव्हापासून ट्विटरचा कारभार एलॉन मस्कच्या हातात गेलाय, तेव्हापासून ट्विटरची हवाच काही वेगळी झालीये. नवीन फिचर नवीन नियम या सगळ्यामुळे ट्विटर जास्त चर्चेत आलाय. अशात आज पुन्हा ट्विटरची चर्चा होतेय कारण मस्क यांच्या एका ट्विटवर फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक लगावलाय.